राष्ट्रीय युवक दिनानिमित्त “रन फॉर स्वदेशी” धावण्याची स्पर्धा उत्साहात संपन्न

0
7

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, चांदूर रेल्वे येथील NCC विभाग व इक्वल ऑपर्च्युनिटी सेल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंती निमित्त दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी “Run For Swadeshi” या एक किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच NCC कॅडेट्स यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. वडनेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. NCC विभागाचे संयोजक डॉ. संगपाल पाढेन, व इक्वल ऑपर्च्युनिटी सेलचे संयोजक डॉ. पी. आर. सरदार यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. पी. आर. वडनेरकर यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण होते, असे मत व्यक्त करून सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे तसेच कार्यक्रम संयोजकांचे अभिनंदन केले.

veer nayak

Google Ad