अमरावती महानगरपालिका निवडणूक : वंचित बहुजन आघाडी–युनायटेड रिपब्लिकन फोरमचे अधिकृत उमेदवार जाहीर

0
19

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक–२०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक ९ (एस.आर.पी.एफ.–वडाळी) मध्ये वंचित बहुजन आघाडी व युनायटेड रिपब्लिकन फोरम यांच्या वतीने अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. या प्रभागात बोधचिन्ह ‘गॅस सिलेंडर’ असून मतदारांनी मोठ्या बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रभाग ‘अ’ मधून इंजि. शैलेश रामदास बागडे (अनुसूचित जाती – ) तर प्रभाग ‘क’ मधून ॲड. भूमिका प्रदीप ढोणे( वानखडे ) (सर्वसाधारण महिला – ) हे उमेदवार रिंगणात आहेत.

वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यात नागरिकाभिमुख विकासकामांवर भर देण्यात आला आहे. त्यामध्ये दर दोन दिवसांनी नियमित कचरा उचल, लहान मुलांसाठी सुसज्ज बालोद्यान, महिला सुरक्षा व प्रत्येक मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे, खुल्या नाल्यांचे गटारलाईन/पाईपलाईनद्वारे व्यवस्थापन, रस्ते खड्डेमुक्त करणे, महापालिकेच्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा, गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधांसह सुसज्य लायब्ररी, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा समावेश आहे.

“एक संधी वंचित बहुजन आघाडीला” देऊन प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन उमेदवारांकडून करण्यात आले आहे.

veer nayak

Google Ad