नगराध्यक्ष प्रियंका विश्वकर्मा;
चांदूर रेल्वे च्या जनतेमधून पहिल्या महिला नगराध्यक्षाचा मान प्रियंका विश्वकर्मा ना मिळाला. भव्य पदग्रहण सोहळा उत्साहात
चांदूर रेल्वे :
चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रा. प्रियंका निलेश विश्वकर्मा ना शहरातील जनतेने पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला, यांच्या भव्य पदग्रहण सोहळ्याचे आयोजन शहरात मोठ्या उत्साहात पार पडले
माझा हा विजय शहरातील प्रत्येक नागरिकाला अर्पण असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तयार राहीन,असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. नगर परिषदेच्या प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.
सर्वप्रथम प्राध्यापक विश्वकर्मा आपल्या निवासस्थानापासून शहरातील नागरिक व समर्थकासह बँड बाजा सोबत पाई चालत नगरपरिषदेत पोहोचल्या, यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले
या पदग्रहण सोहळ्यात विचारपीठावर शिवसेनेचे माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष महात्मे, संगीता ठाकरे, शिवसेनेचे आशिष धर्माळे, माजी नगराध्यक्ष प्रा. प्रभाकर वाघ, गणेश रॉय, मुलायमचंद जैन, वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रा. प्रियंका विश्वकर्मा उपस्थित होते. याशिवाय नवनिर्वाचित नगरसेवक हर्षल वाघ, सुमेध सरदार, अरिहंत गेडाम, शेख निलोफर, प्रसन्नजित तेलंग, विनोद जोशी, मदनजी तिवारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी सांगितले की, “प्रियंका ताईंच्या माध्यमातून तुम्ही शहराला एक सक्षम आणि अभ्यासू नगराध्यक्ष दिला आहे. त्याबदल्यात शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुबलक निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. येत्या काळात चांदूर रेल्वे शहर विकासाच्या बाबतीत दर्जेदार व आदर्श नगर पालिका म्हणून ओळखले जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आपल चांदूर पॅनलचे नेते निलेश विश्वकर्मा यांनीही उपस्थित नागरिकांचे आभार मानत, नगर परिषदेमार्फत शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे ठाम आश्वासन दिले.
—–
दरम्यान, दुपारी १२ वाजता नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रा. प्रियंका विश्वकर्मा यांनी अधिकृतपणे आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे व नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षांचे स्वागत करून त्यांना पदभार सोपविला. पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच नगर परिषदेच्या पुढील सभेची सूचना नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीने काढण्यात आली, यामुळे कामकाजाला तत्काळ गती मिळाल्याचे चित्र दिसून आले.
——
पदग्रहण सोहळ्यानिमित्त नगर परिषद इमारत आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली होती. बाह्य व अंतर्गत सजावट पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दृश्य पाहायला मिळाले. एकूणच हा पदग्रहण सोहळा शहराच्या राजकीय व विकासात्मक वाटचालीसाठी नवा उत्साह देणारा ठरला. कार्यक्रमाचे सूत्र संचलन निवेदिता वाघ यांनी प्रास्ताविक हर्षल वाघ तर तर आभार सुमेध सरदार यांनी मानले


















