एस ओ एस कब्स बुधवार बाजार रोड धामणगाव रेल्वे येथे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा

0
8

दि.१ मे २०२६

एस ओ एस कब्स धामणगाव रेल्वे येथे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन अत्यंत उत्साहात व भारदस्त पद्धतीने साजरे करण्यात आले.महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिवस आहे.हा दिवस महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृति, इतिहास आणि प्रगतीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.

ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

शाळेच्या प्री प्रायमरी हेड माननिय शबाना खान यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात महाराष्ट्र राज्याचा ध्वज अभिमानपूर्वक फडकवण्यात आला. ध्वजारोहणाच्या राज्याप्रती आदर व्यक्त केला.

यावेळी प्री. प्रायमरी हेड माननीय शबाना खान यांनी आपल्या मार्गदर्शनपर व प्रभावी भाषणातून महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा इतिहास, त्यामागील संघर्ष व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे महत्त्व उलगडून सांगितले. तसेच कामगार दिनानिमित्त कष्टकरी वर्गाच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शेतकरी, कामगार व विविध क्षेत्रातील श्रमिक यांच्या अथक परिश्रमामुळे देशाची प्रगती शक्य होते, असेही त्यांनी नमूद केले. परिश्रम, शिस्त, प्रामाणिकपणा व सामाजिक जबाबदारी या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले. त्यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा अभिमान बाळगून एक आदर्श नागरिक बनण्याचा संदेश दिला.

हा कार्यक्रम शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अत्यंत यशस्वी ठरला.

संपूर्ण कार्यक्रमाने महाराष्ट्राच्या अस्मितेला उजाळा देत सामाजिक भान, राष्ट्रीय एकात्मता आणि राज्याभिमान जागवला.

 माननीय प्री.प्रायमरी हेड शबाना खान यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रणिता जोशी, वर्षा देशमुख, रेणुका सबाणे, आकांक्षा महल्ले, विशाखा मेंढे, अश्विनी नांदने, स्नेहल दुर्गे, ऋचा अडवलकर यांनी सहकार्य केले.

veer nayak

Google Ad