दारू पिण्याच्या वादावरून केली हत्या. वाईन बार विटाळा येथील घटना

0
66

धामणगांव रेल्वे :- तालुक्यातील विटाळा या गावात व मौजा वकनाथ असलेल्या बियर बार मध्ये दारू पिण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली व त्यातच एकाचा मृत्यू झाला. मृतकाचे नाव अनिल सुखदेव आव्हाड वय 68वर्ष धंदा -सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी रा. गुंजखेडा पुलगाव असे आहे. मृतक अनिल व आरोपी अमोल समरीत वय 32वर्ष रा. विटाळा हे नेहमी दारू प्यायला एकाच देशी दारू च्या दुकानात येतं असल्यामुळे ओळख होती. काल दि 09/02/2026च्या दुपारी नेहमीप्रमाणे दोघेही दारू प्यायला आले व शुल्लक कारणावरून दोघात मारहाण झाली त्यात आरोपी अमोल समरीत याने मृतक अनिल च्या छातीवर मारहाण केल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मंगरूळ दस्त पोलीस स्टेशन ला मिळताच सह. पोलीस उपनिरीक्षक ठावरे हे आपल्या दस्ता सोबत घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक चमूला घटनास्थळी पाचारण करण्यात आले व मृतकाचा घटनास्थळ पंचनामा करण्यात आला व शव पोस्टमॉर्डम करिता ग्रामीण रुग्णालय पुलगाव येथे नेण्यात आले असून आरोपी अमोल समरीत याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून भा. दं. वी. चे कलम 302नुसार आरोपीला तात्काळ अटक करण्यात आले आहे. पुढील तपास मंगरूळ दस्त चे नवनियुक्त ठाणेदार अहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो. उपनिरीक्षक ठावरे,पो. हे.कॉ. राठोड, सतीश ठवकर मंगरूळ दस्तगीर पोलीस करत आहे.

veer nayak

Google Ad