भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिवस साजरा

0
43

आर्वी, प्रतिनिधी / पंकज गोडबोले

आर्वी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिवस साजरा करण्यात आला. रविवार दि. 28 डिसेंबर ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जनसंपर्क कार्यालय गांधी चौक, नाग मंदिर जवळ आर्वी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत परमपूज्य महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून स्थापना दिवस साजरा करण्यात आला. स्थापना दिवसाच्या प्रास्ताविकामधून शहराध्यक्ष प्रा डॉ सुधाकर भुयार यांनी आजच्या दिवसाचे महत्त्व विशद करताना राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास व ई.स. 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना ही एक सर्व भारतीयांसाठी संजीवनी तर होतीच या विचारातूनच काँग्रेस पक्ष एक चळवळ म्हणून राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी प्रयत्नशिल होती.

यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने चंद्रशेखरजी जोरे उपाध्यक्ष वर्धा जिल्हा, श्री अनंतराव झाडे, आर्वी तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री चंद्रशेखर वनस्कर श्री विनोद हुड, वाढोना जिल्हा परिषद सर्कलचे काँग्रेस उपाध्यक्ष श्री कैलासराव अवथले, खरांगणा जिल्हा परिषद सर्कलचे काँग्रेस उपाध्यक्ष श्री विलास ठवरे, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री विलासराव निस्ताने, श्री पंकज गोडबोले श्री सुधाकरराव वाघमारे, सौ शितलताई गायकवाड, सौ.लंगडेताई, सौ.राखी बिरोले महेश बिरोले उपस्थित होते.

veer nayak

Google Ad