चांदूर रेल्वे : अतुल विद्या मंदिरचे संस्थापक स्वर्गीय अण्णासाहेब जगताप यांच्या स्मृतिदिनानिमित्त राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, चांदूर रेल्वे येथे विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी अतुल विद्या मंदिराच्या अध्यक्षा प्रा. सौ. उत्तराताई विरेंद्रभाऊ जगताप, राजर्षी शाहू सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी. आर. वडनेरकर, स्व. अतुल जगताप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पी. एस. तळोकार, राजर्षी शाहू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री. कुणाल सिंगलवार व सौ. वर्षा भगत यांनी स्व. अण्णासाहेब जगताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी अतुल विद्या मंदिरातील सर्व प्राध्यापक, शिक्षेकत्तर कर्मचारी यांनीही स्व. अण्णासाहेब जगताप यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे आयोजन व संचालन प्राध्यापक, डॉ. रेखा व्ही. केणे, डॉ. संपदा पी. पाथरकर, डॉ. मीनल जे. केचे, डॉ. रोशनी एन. भगत, ममता एस. पळसपगार, सोनू एम. देशमुख यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षेकत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.











