हितेश व्यास नूतन विदर्भ शिक्षण मंडळाचे सचिव पदावर. धामणगाव पुष्करणा समाज व पुष्करणा फाउंडेशन अमरावती तर्फे अभिनंदन.

0
37
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,

अमरावती जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांमध्ये गणल्या जाणाऱ्या नूतन विदर्भ शिक्षण मंडळाच्या सचिव पदावर हितेश व्यास यांची नियुक्ती झालेली आहे. सचिव पदावर नियुक्त झालेले हितेश व्यास यांनी याच शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलेले आहे हे येथे उल्लेखनीय तसेच ते याच शिक्षण संस्थेचे सचिव हे गौरवास्पद असल्याचे सांगण्यात आले. पुष्करणा समाजासाठी ही अभिमानाची बाब आहे या अनुषंगाने धामणगाव रेल्वे येथील पुष्करणा समाज तसेच अमरावती येथील पुष्करणा फाउंडेशन च्या वतीने हितेश व्यास यांचा सत्कार केला.

यावेळी प्रसिद्ध गायक मुकेश छांगानी यांनी कवितेतून अभिनंदन केले. याप्रसंगी हितेशचे वडील नरोत्तम व्यास यांनी समाजाच्या एकतेचे कौतुक केले. या नियुक्ती करीता धामणगाव च्या कमल छांगानी,ओमप्रकाश जोशी दिलीप छांगानी,भरत व्यास, पुरुषोत्तम जोशी, कमल पुरोहित सह अमरावतीच्या पुष्करणा फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रमोद पुरोहित, उपाध्यक्ष शशिकुमार व्यास, पवन छंगाणी, प्रचार प्रमुख अनिल पुरोहित, ललित छंगाणी, कार्यकारिणी चे प्रा. डॉ.महेंद्र छंगाणी, संजय छांगाणी,उदय छांगानी, गिरीराज छांगानी,जवाहर व्यास,आनंद पुरोहित, प्रशांत व्यास, आशिष व्यास,अजय पुरोहित, सोबत अमरावती पुष्करणा समाजाचे गणमान्य बांधवात नरोत्तम व्यास, चंपा देवी व्यास,भजन गायक मुकेश छंगाणी, सोनू आचार्य, गिरिराज पुरोहित, भरत बोहरा, आशीष व्यास, राजेश व्यास, मनीष बोहरा, कल्पेश छंगाणी, चिन्मय पुरोहित, अखिलेश व्यास यांनी अभिनंदन केले आणि उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्यात

veer nayak

Google Ad