सार्वजनिक गो रक्षा समिती धामणगाव रेल्वे च्या वतीने भव्य बाईक रॅली गोमाता की जय,वंदे मातरम, भारत माता की जय घोषणांनी शहर दुमदुमले  राष्ट्रपती, राज्यपाल, प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांना निवेदन 

0
43

धामणगाव रेल्वे,

गाईला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यासाठी, वाढती गोहत्या आणि गोतस्करी थांबवण्यासाठी, तसेच नवीन कठोर कायदे करण्यासाठी सार्वजनिक गौ रक्षा सेवा समितीच्या वतीने धामणगाव शहरात सोमवारी भव्य दिव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले

तालुक्यातील तरुणांच्या प्रचंड उत्साहाने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मुख्य मार्गाने सदर रॅली चे आयोजन तहसील कार्यालय पर्यंत करण्यात आले

याप्रसंगी शेकडोच्या संख्येत उपस्थित गो प्रेमींनी गाय बचाव, राष्ट्र बचाव,भारत माता की जय, वंदे मातरम्,गो मातेला राष्ट्र माता घोषित करा अशा गगनभेदी घोषणा दिल्यात

तहसील कार्यालय येथे राष्ट्रपती राज्यपाल पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या नावाने डॉक्टर आशिष सालनकर, गौरक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, उपाध्यक्ष गिरीश मुंदडा,राजकुमार केला, किन्नर गुरु जारा दिदी, बरखा दिदी, तथा सना दिदी यांच्या नेतृत्वात व शेकडो गो प्रेमींच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले.

……………………………

गौ मातेला राष्ट्रमाता घोषित करून अंमलबजावणी व्हावी… डॉ. सालनकर

गौ मातेला राष्ट्रमाता म्हणून दर्जा प्राप्त व्हावाच सोबतच गोमातेचे आणि गोवंशाचे संगोपन आणि संरक्षण हे सुद्धा शासनाने कायदेशीर रित्या करावेत त्यामुळे गोमाता आणि गौवंश सुरक्षित राहतील

केवळ कायदाच नव्हे तर अंमलबजावणी सुद्धा त्या कायद्याची व्हावी अश्या प्रतिक्रिया तहसीलदार प्रफुल देशमुख यांना निवेदन देताना वैयक्तिकरित्या मोठ्या प्रमाणात गौ संगोपन करणारे गौ प्रेमी डॉ. आशिष सालनकर यांनी व्यक्त केले

veer nayak

Google Ad