संविधान महोत्सव सप्ताह

0
24

संविधान दिनानिमित्त घर घर संविधान महोत्सव सप्ताह 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर, धामणगाव रेल्व येथे वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक न्याय विभाग अंतर्गत राबवण्यात येत आहे या अनुषंगाने धामणगाव रेल्वे येथील सरस्वती नर्सिंग विद्यालय येथे सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सरोज आवारे यांच्या मार्फत संविधान महोत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सर्वात प्रथम क्रांतीज्योती ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त फोटो पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

 

संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन करून संविधानातील मूलभूत अधिकार व हक्क या विषयावर सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सरोज आवारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले घरघर संविधान महोत्सव साजरा करण्याचा हेतू समाजातील प्रत्येक व्यक्तीला संविधानातील हक्क व अधिकार तसेच संविधानाने आपल्याला काय दिले आहे याची माहिती असणे आवश्यक आहे .हा उपक्रम बार्टी महासंचालक वारे सर व विभाग प्रमुख डॉ जोगदंड सर तसेच प्रकल्प अधिकारी अनिता गवई यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे कार्यक्रमाला उपस्थित सामाजिक न्याय विभाग अंतर्गत सरोज आवारे विद्यालयाचे प्राचार्य पूजा जयस्वाल, अंजली सुटे मॅडम ,वैष्णवी राऊत मॅडम ,रवी सर ,नयन सर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

veer nayak

Google Ad