केक्स एन मोअर’चा पुढचा टप्पा; ५ वर्षांची होम डिलिव्हरी सेवा, आता स्वतंत्र दुकान सुरू

0
34

धामणगाव रेल्वे : शहरातील नगरपरिषद कार्यालयाजवळील बुधवार बाजार परिसरात केक्स एन मोअर या बेकरीने आता स्वतंत्र दुकान सुरू करून ग्राहक सेवेत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. या बेकरीचे संचालक अनिरुद्ध देशमुख असून, त्यांनी मागील पाच वर्षांपासून केवळ होम डिलिव्हरीच्या माध्यमातून नागरिकांना केक व बेकरी पदार्थांची सेवा दिली आहे.

घरपोच सेवेमुळे दर्जा, चव आणि वेळेवर मिळणारी ऑर्डर यामुळे ‘केक्स एन मोअर’ने ग्राहकांचा भक्कम विश्वास संपादन केला. त्याच विश्वासाच्या बळावर आता बुधवार बाजारातील नगरपरिषद बाजूला प्रत्यक्ष दुकान सुरू करण्यात आले आहे.

या दुकानात वाढदिवस, लग्न, वर्धापनदिन यांसारख्या विविध कार्यक्रमांसाठी कस्टम केकसह केक, पेस्ट्री, कपकेक व इतर बेकरी पदार्थ उपलब्ध आहेत. स्वच्छता, गुणवत्तापूर्ण साहित्य आणि वाजवी दर ही या दुकानाची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे संचालक अनिरुद्ध देशमुख यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षांच्या यशस्वी होम डिलिव्हरी सेवेनंतर सुरू झालेल्या या दुकानामुळे नागरिकांना प्रत्यक्ष खरेदीची सोय होणार असून, स्थानिक व्यापारालाही चालना मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

veer nayak

Google Ad