तालुक्यातील पेठ रघुनाथपुर ग्रामपंचायती मध्ये मोठा भ्रष्टाचार. शौचालय दुरुस्ती करिता आलेले पैसे सरपंच व सचिव यांनी परस्पर केले लंपास.

0
77

दि. ९ जानेवारी २०२६

पेठ रघुनाथपुर , ता. धामणगाव रेल्वे

     धामणगाव तालुक्यातील पेठ रघुनाथपुर येथे १५ वा वित्त आयोग निधी सण २०२२ – २३ मध्ये ग्रामपंचायत कार्यालयातील शौचालय दुरुस्ती करीता ५०,०००/- रुपयांची तरतूद होती. ज्यावेळी गावातील काही नागरिकांनी गेल्या मागील ५ वर्षांमध्ये कोण कोणती कामे झाली व त्याकरिता किती निधी खर्च झाला याचा ईग्रामस्वराज या ऑनलाइन प्रणालीवरून अहवाल काढला तेव्हा असे निदर्शनास आले की १५ वा वित्त आयोग निधी सण २०२२ – २३ अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयातील शौचालय दुरुस्ती करीता ५०,०००/- रुपये आले होते व दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी आलेला निधी हा खर्च सुद्धा करण्यात आला. परंतु ज्यावेळी ग्रामपंचायत कार्यालयातील शौचालयाची पाहणी करण्यात आली त्यावेळी तेथील शौचालय व मुतारी नादुरुस्त अवस्थेत आढळले. सदर विषयाची ईग्रामस्वराज या ऑनलाइन प्रणालीवर अधिक माहिती घेतल्यावर असे समजले की सरपंच व सचिव यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील शौचालय दुरुस्तीचे काम कागदोपत्री पूर्ण झाले असे दाखवून ५०,०००/- रुपये ”एम.एस अवधूत महाराज कन्स्ट्रक्शन’ या एजन्सी च्या खात्यामध्ये दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी वर्ग केले.

    त्यामुळे या भ्रष्टाचाराची त्वरित दखल घेत गावातली सामाजिक कार्यकर्ते दर्पण दादा वडस्कर, सुनिलभाऊ टाले, ग्रामपंचायत सदस्य अनिलभाऊ भोळे यांनी मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती धामणगाव रेल्वे यांच्याकडे तक्रार दाखल करत सरपंच, सचिव यांच्यावर तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे.

veer nayak

Google Ad