अमरावती, दि. 1 (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या स्थापनानिमित्त आज जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा खनीकर्म अधिकारी प्रणिता चाफले, तहसिलदार निलेश खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.












