भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आर्वी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : दि. 14/04/2026 शहर काँग्रेस कमिटी व ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती कार्यक्रम अनंत बाबूजीदादा मोहोड यांचे संपर्क कार्यालय चोरडिया मिलच्या बाजूने अग्रवाल कॉम्प्लेक्स आर्वी येथे संपन्न झाला. यावेळी सर्व उपस्थितांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार घालून कॅण्डल लावण्यात आले.

 

याप्रसंगी सामाजिक कार्यात योगदान असणाऱ्या आर्वी शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व सामाजीक कार्यकर्त्या सौ. शितलताई गायकवाड व सौ. लताताई लांडगे यांचा यथोचित शाल देऊन गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेबांच्या सामाजिक व राष्ट्रीय कार्यावर विचार मंथन करण्यात आले. यानंतर जनता नगर आर्वी येथील बुद्ध विहाराच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हारारपण करण्यात आले. याप्रसंगी वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखर जोरे ,आर्वी शहर अध्यक्ष प्रा.डॉ. सुधाकर भुयार, आर्वी शहर उपाध्यक्ष पंकज गोडबोले, सुधाकरजी वाघमारे उपाध्यक्ष आर्वी शहर तळेगाव येथील माजी उपसरपंच .सुभाष पाचपोहर, हिफाजत अली ,अल्पसंख्यांक काँग्रेसचे संघटक मोहम्मद हुसेन तसेच आर्वी शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस महेश बिरोले संजय गायकवाड, लांडगे, मोठ्या संख्येत प्रामुख्याने पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

veer nayak

Google Ad