धामणगाव रेल्वे,
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपिठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जि. नाशिक च्या सानिध्यात श्री स्वामी समर्थ केंद्र न्यु लुनावत नगर, एल. आय. सी. ऑफिसच्या मागे धामणगाव रेल्वे च्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमीत्त
अखंड नाम, जप, यज्ञ, सप्ताह व सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळा भव्य आयोजन करण्यात आले
सप्ताहाच्या सांगता निमित्ताने आज भव्य महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे
सप्ताहाच्या निमित्ताने ०९ एप्रिल गुरुवार ते १५ एप्रिल बुधवार २०२६ दररोज चे याग तसेच ८ एप्रिलला ग्रामदेवता सन्मान, मंडल मांडणी गुरुवार ९/०४/२०२६ मंडल स्थापना, अग्रिस्थापना, स्थापित देवता हवन शुक्रवार दिनांक १० एप्रिल रोजी नित्वस्वाहाकार गणेश याग/मनोबोध वाग दिनांक
११ एप्रिल शनिवारला
नित्य स्वाहाकार, चंडी याग तसेच १२ एप्रिल ला
नित्य स्वाहाकार, श्री स्वामी याग
सह
सोमवार १३ एप्रिल रोजी
नित्य स्वाहाकार, गीताई याग
मंगळवार दिनांक १४/०४/२०२६ रोजी
नित्य स्वाहाकार, श्री रुद्र याग आणि श्री मल्हारी याग आयोजित करण्यात आले
आज बुधवार दिनांक १५ एप्रिलला बलि पूर्णाहुती, श्री सत्यदत्त पूजन, श्री महानैवेद्य आरती व अखंड नामजप यज्ञ सप्ताह सांगता होणार असून
सायंकाळी ७ वाजता पासून महानैवद्य आरती नंतर भव्य
महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे
सर्व भक्तांनी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याची आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्र,न्यु लुनावत नगर च्या वतीने करण्यात आलेले आहे















