मंगरूळ येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

0
41
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

मंगरूळ : दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगरूळ येथील दस्तगीर बगाजी महाराज चौकात बाळाभाऊ पिंपळे यांच्या घरासमोर छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते बाबा ठाकूर होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगोले व आशिष तायवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम व आदर्श कार्याची आठवण करून त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.

या प्रसंगी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजयंती उत्साहात साजरी केली. कार्यक्रमाचे आयोजन बाळाभाऊ पिंपळे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. कार्यक्रम शांत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

veer nayak

Google Ad