ढगा भवन येथे श्री संत हरिहर महाराज जन्मोत्सव उत्साहात संपन्न

0
42
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

       श्री संत हरिहर महाराज बेलदार सेवा समिती, वर्धा यांच्यावतीने श्री संत हरिहर महाराज जन्मोत्सव सोहळा रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी स्थानिक ढगा भवन, तालुका कारंजा (घाडगे), जिल्हा वर्धा येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. जन्मोत्सवाच्या निमित्ताने सकाळी 7.00 ते 9.00 या वेळेत अभिषेक होमहवन आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सकाळी 10.00 वा. विख्यात भागवताचार्य ह. भ. प. श्री केशवानंदजी महाराज चवरे शास्त्री यांचे रसाळ काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनातून महाराजांच्या कार्याचा महिमा भक्तांसमोर मांडण्यात आला. दुपारी 12:30 वाजता आयोजित मुख्य कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आर्वी विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री सुमितजी वानखेडे उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी महाराजांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. याप्रसंगी *श्री संत हरिहर महाराज जीवन लीला वैभव* या पुस्तकाचे प्रकाशन माननीय श्री सुमितभाऊ वानखेडे आमदार आर्वी विधानसभा यांच्या हस्ते करण्यात आले. पुस्तकाचे लेखक माननीय श्री निळकंठराव मेहरे यांचीही विशेष उपस्थिती होती. त्यांनी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. नागपूर येथील अनिलराव बमनोटे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संत हरिहर महाराज बेलदार सेवा समितीचे अध्यक्ष श्री देविदास चवरे यांनी केले. त्यांनी समितीच्या कार्याचा आढावा मांडला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री संजय बमनोटे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या सांगते नंतर दुपारी 1.30 ते 4:30 यावेळेत उपस्थित हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी बेलदार सेवा समितीचे सर्व पदाधिकारी सर्वश्री देविदास चवरे, महेंद्र बमनोटे, प्रकाश बमनोटे, दिनेश अलोने, सुभाष देवगडे, लक्ष्मण चवरे, आशिष मलीये, भैय्यालाल बमनोटे, संजय बमनोटे, सुनील दाभाडे, प्रभाकर चवरे, अरविंद गेटमे, रविंद्र बमनोटे, सचिन मालोदे, मोहन बमनोटे आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad