हिंदूंचा पराक्रमाचा संघर्षाचा आणि राष्ट्रभक्ती, राष्ट्रशक्तीचा इतिहास …कमल छांगाणी सोनेगाव खर्डा मंडलाचे सकल हिंदू संमेलन .

0
23

धामणगाव रेल्वे,
हिंदूंचा पराक्रमाचा, संघर्षाचा तसेच राष्ट्रभक्तीचा आणि राष्ट्रशक्तीचा असा इतिहास आहे. हिंदूंमध्ये प्रचंड परिवर्तन करण्याची श्री हनुमंता सारखी शक्ती सुद्धा आहे परंतु गरज आहे की ती शक्ती आमच्या मध्ये आहे ही आठवण्याची तेच कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत असल्याचे प्रतिपादन धर्म जागरण प्रांत निधी सह प्रमुख कमल छांगाणी यांनी केले. कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्व:बोध, नागरिक शिष्टाचार, आणि पर्यावरण हे पंच परिवर्तन समाज परिवर्तनाचे माध्यम होऊन यातून समर्थ हिंदू समाज निर्माण होऊ शकतो असे ही ते म्हणाले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, गुरुगोविंदसिंह यांचे हिंदू धर्माकरिता असलेले इतिहास विशद केले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पुर्ण झाले या शताब्दी निमित्ताने संपूर्ण देशभरात सकल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.

धामणगाव रेल्वे तालुक्यातील सोनेगाव खर्डा मंडलाचे सकल हिंदू संमेलनात छांगाणी बोलत होते मंचावर आशीर्वचन देण्याकरिता अंजनसिंगी येथील गौरक्षणचे प्रमुख ह.भ.प. सारंग महाराज ढोरे संमेलन संयोजक सुभाषराव लुटे उपस्थित होते, भारत माता पूजन, दीप प्रज्वलन, माल्यार्पण करून संमेलनाची सुरुवात झाली. ह.भ.प सारंग महाराज ढोरे यांनी आपल्या उदबोधनातून धर्म टिकेल तर आपली संस्कृती टिकेल, आपला देश टिकेल. गौमाता, गंगा माता आणि भारत माता हेच आपले आराध्य आहेत.

शेवटी भारत मातेची आरती ने संमेलनाची सांगता झाली. कार्यक्रमाला सोनेगाव, खर्डा, निभोंरा बोडखा गावातील नागरिक महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिंडी व भजन मंडळीने नगर भ्रमन केले दिंडी आणि भजनाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्तिकी खैरकार सूत्र संचालन संस्कृती राऊत तर आभार आर्या राऊत ने मानले
संमेलनाचे यशस्वी आयोजन करिता बबलू खैरकर,सागर पंचबुद्धे, मारुती दांडेकर, किशोर देशमुख, मोहन माळोदे, मनीष पंचबुद्धे, चंदू राऊत, मंगेश लोंदासे, प्राजन गाढवे, धिरेंद्र ईलमे, लिलेश राऊत, नागोराव पंचबुद्धे यांनी परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad