धामणगाव रेल्वे :- नगर परिषदेचे वार्षिक उलाढाल नगर परिषद कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन सर्वस्वी नगर परिषद कर,पाणी पट्टी कर,मालमत्ता कर नगर परिषद द्वारे आकारण्यात येणाऱ्या टॅक्स वर अवलंबून असते शासनद्वारे शहराच्या विकासासाठी मिळणारा विकास निधी हा देखील नगर परिषदेच्या वार्षिक टॅक्स च्या वसुली वर अवलंबून असते मात्र अनेक लहान नगर परिषद मध्ये कर्मचाऱ्यांना टॅक्स वसुली साठी तारेवरची कसरत करावी लागते तगादा लावून देखील टॅक्स वसुली चा टार्गेट पूर्ण होत नाही मात्र धामणगाव नगर परिषदेचे नवनिर्वाचित पाणी पुरवठा सभापती यांनी नगराध्यक्षा सौ अर्चनाताई अडसड – रोठे व आमदार प्रतापदादा अडसड यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पट्टी वसुली साठी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.त्यांनी पाणी पट्टी भरा आणि बक्षिसे मिळवा अशी योजना राबवित महाराष्ट्रातून पाणी पट्टी वसुली साठी प्रथमच प्रयोग अंमलात आणला आहे
.१ एप्रिल २०२५ पासून २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पाणी पट्टी भरणा करणाऱ्या नागरिकांतून सोडतच्या माध्यमातून प्रथम पाच मोठे बक्षिसाचे वितरण करण्यात येणार आहे तर प्रत्येकी ६ लोकांना प्रोत्साहन पुरस्कार सुद्धा या योजनेद्वारे मिळणार आहे.प्रथम पुरस्कार १६५ लिटर चे फ्रीज,द्वितीय पुरस्कार एलईडी टीव्ही,तृतीय पुरस्कार शिलाई मशीन,चतुर्थ पुरस्कार कुलर,तर पाचवे पुरस्कार गॅस शेगडी असे पाच पुरस्कार सोडत च्या माध्यमातून मिळणार आहे अशी माहिती पाणी पुरवठा सभापती विलास बुटले यांनी दिली आहे.विशेष म्हणजे प्रति नळ जोडणी व पाणी पुरवठा साठी धामणगाव नगर परिषद ला प्रति कनेक्शनच्या मागे वार्षिक ५ हजार ४६५ रुपये खर्च येतो त्यातले ३४६५ हजार रुपये नगर परिषद अदा करते मात्र धामणगाव नगर परिषद द्वारे १६०० रुपये वार्षिक पाणी पट्टी आकारण्यात येतो यावर्षी पासून ही पाणी पट्टी २००० हजार रुपये करण्यात आली असली तरी नगर परिषद ला लागणाऱ्या खर्चापेक्षा कमी असल्याची माहिती पाणी पुरवठा सभापती विलास बुटले यांनी दिली आहे.धामणगाव शहराच्या नागरिकांनी या उपहार योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पट्टी कर भरून धामणगावाच्या इतिहासात प्रथमच व महाराष्ट्रातुन प्रथमच राबविण्यात येणाऱ्या भव्य बक्षीस योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्षा सौ अर्चना अडसड -रोठे , आमदार प्रतापदादा अडसड व या योजनेचे शिल्पकार पाणी पुरवठा सभापती विलास बुटले यांनी केले आहे.महत्वाचे म्हणजे या बक्षीस योजनेच्या उपहाराचे पूर्ण खर्च पाणी पुरवठा सभापती विलास बुटले यांनी स्वतःउचलला आहे हे विशेष!पाणी पुरवठा विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या या योजनेचे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.












