लोकनायक स्व.ठाकुर उमरावसिंह यांची ५५ पुण्यतिथी साजरी

0
5

आर्वी ,प्रतिनिधी /पंकज गोडबोले

आर्वी : स्थानिक ठाकूर उमरावसिंह प्राथमिक शाळा व कन्नमवार विद्यालय आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.ठाकुर उमरावसींह यांची ५५ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्षस्थानी कन्नमवार विद्यालय माजी मुख्याध्यापक भैय्या साहेब केंडे सर, तिडके विद्यालय नागपूर चे पर्यवेक्षक विलास बोरगमवार सर, सुशील सिंह ठाकुर, कन्नमवार शाळेचे मुख्याध्यापक रेवतकर सर, शाळेचे पर्यवेक्षक कपीलसिंह ठाकुर,स्व.ठाकुर उमरावसिंह प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पवन गीराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात भैय्या साहेब केंडे यांनी स्व.ठाकुर उमरावसिंह यांनी त्यांच्या केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली ठाकूर उमरावसिंह यांनी नगराध्यक्ष असताना आर्वी शहरातील अनेक विकास कामे केली त्यांना असलेले शंकरपट, कुस्ती असलेली आवड यांची सविस्तर माहिती दिली.
कन्नमवार विद्यालय व स्वर्गीय उमराव सिंह ठाकूर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी स्व ठाकूर उमराव सिंह यांच्या जीवन कार्यावर भाषणे दिली.

कार्यक्रमाची प्रस्तावीक मुख्याध्यापक पवन गिराडे यांनी केले तर संचालन श्रद्धा पांडे मॅडम यांनी केले तसेच आभार प्रदर्शन कन्नमवार विद्यालय शाळेचे पर्यवेक्षक कपिल सिंह ठाकुर यांनी मानले. या कार्यक्रमा वेळी स्वर्गीय ठाकूर उमराव सिंह प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक तसेच कन्नमवार विद्यालय आर्वी येथील सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

veer nayak

Google Ad