मैसूरू (कर्नाटक) येथे होणाऱ्या मेन अँड वूमन पॅरा थ्रो बॉल नॅशनल चॅम्पियनशिप 2026 या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी प्रशांत झाडे यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा दि. 24, 25 व 26 जानेवारी 2026 रोजी मैसूरू येथे पार पडणार आहे.
प्रशांत झाडे यांनी आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर, उत्कृष्ट कामगिरी व खेळातील शिस्तीमुळे ही निवड मिळवली असून, त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाची छाप पाडत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल आसरा ग्रुप धामणगाव रेल्वे तर्फे सत्कार करण्यात आला त्यावेळी आसरा ग्रुप चे नितीनभाऊ कनोजिया , डॉ. आशिषजी सालंकर , दिनेश वाघमारे , विशालभाऊ पोळ , भूषणभाऊ कांडलकर , आशिष डुमरे उपस्तित होते . तसेच या यशामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार, क्रीडा मार्गदर्शक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असून, स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून यश मिळवण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मैसूरू येथे होणाऱ्या या राष्ट्रीय पॅरा थ्रो बॉल स्पर्धेत प्रशांत झाडे यांच्याकडून उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











