धामनगाव रेल्वे :
धामनगाव नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत गिरीश (बंडू) पुखराज मूंदड़ा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्षा अर्चना अडसड (रोठे) यांनी अधिकृत घोषणा करत त्यांना उपाध्यक्ष म्हणून निर्वाचित घोषित केले.त्याच प्रमाणे स्वीकृत नगरसेवक म्हणून डॉ.असित पसारी व ऍड.रीना मनोज व्यास यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. ही बिनविरोध निवड नगराच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात आहे.
सामाजिक व सार्वजनिक जीवनात सक्रिय सहभाग असलेले गिरीश मूंदड़ा विविध क्षेत्रांतून विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ते गोरक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, श्रीराम शिक्षण संस्थेचे संचालक आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहेत. त्यांच्या उपाध्यक्षपदामुळे नगर परिषदेत अनुभव, समतोल आणि विकासाभिमुख नेतृत्वाला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


यावेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पूनम कळंबे, कार्यालय अधीक्षक प्रतिभा डोंगरे, गट नेता नरेंद्र चौधरी, नगरसेवक डॉ. हेमकरण कांकरीया, गोपाल द्विवेदी, रवि कुकरेजा, मुरलीधर पतके, दर्शन राठी, जगदीश राय, विलास बूटले, अंशुल बडगैया, मंजिरी भोगे, प्रतिभा खोब्रागडे, मनिषा शिरभाते, रीना साहू, रंजना शेलोकार, सीमा बागडे, प्रियंका जवंजाळ, काजल उपरीकर, सीमा पेंदाम, अंजली मार्वे, स्वच्छता निरीक्षक आकाश सोनेकर, लेखापरीक्षक रत्नेश खडसे, प्रशासकीय अधिकारी विनोद अंबाडकर, कर व प्रशासकीय अधिकारी पंकज इंगळे, नगर अभियंता शेखर ढबाले, कनिष्ठ अभियंता प्रदीप सहारे आदी उपस्थित होते.










