मंगरूळ दस्तगीर येथे नवीन काँग्रेस ग्राम कमिटी घोषित काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांची बैठकीला अनुपस्थिती

0
153

मंगरूळ दस्तगीर | प्रतिनिधी

धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथे दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत नवीन ग्राम काँग्रेस कमिटीची घोषणा करण्यात आली. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांवर संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र या महत्त्वाच्या बैठकीस काही आजी व माजी काँग्रेस पदाधिकारी अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले.

कार्यक्रमाला गैरहजर असलेल्या काही व्यक्ती स्वतःला काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणवून घेत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी, “स्वयंघोषित कार्यकर्त्यांच्या भूलथापांना कोणीही बळी पडू नये,” असे आवाहन केले.

या बैठकीत गिरीश गाडेकर यांची ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. विनोद बुटले यांची उपाध्यक्षपदी, जावेद खान व अविनाश दुधे यांची सचिवपदी, अमोल भोयर यांची सहसचिवपदी, सचिन कडू यांची कोषाध्यक्षपदी तर स्मृती किरण धारवेकर यांची सरचिटणीसपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.

यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष पंकज वानखडे, माजी बांधकाम सभापती सुरेश निमकर, माजी उपसभापती माधुरी दुधे, महिला शहर काँग्रेस अध्यक्ष नीलिमा रबडे, ग्रामपंचायत सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

veer nayak

Google Ad