धामणगाव बाजार समितीमध्ये नवीन तूर खरेदीचा शुभारंभ 8111 रूपये भाव मिळाला.

0
6
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे: स्थानिक बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज बाजार आवारामध्ये आज नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर गुरुवार रोजी माजी आमदार श्री. प्रा. विरेंद्रभाऊ जगताप यांच्या शुभहस्ते तुर खरदीच्या शुभारंभप्रसंगी 8111 प्रती विटल भाव मिळाला.

तुर खरेदीच्या शुभारंभ प्रसंगी आडते मुकेश पंनपालिया व आडत व दिपक राजनकर यांच्या आडत मध्ये तरोडा येथील शेतकरी अरुण कुकडे व गजानन हटवार शेतकरी यांच्या तुरी ला मनीष केला यांच्या खरेदी मध्ये 8111 रु भाव मिळाला मिळाला. या तूर खरेदीच्या शुभारंभ मा. माजी आमदार प्रा. विरेंद्रभाऊ यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ देऊन शेतकरी बंधुचा सन्मान करण्यात आला, 

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला समितीच्या सभापती कविता ताई श्रीकांत गावडे यांनी महापुरुषाच्या च्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली 

या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी मा. आमदार विरेंद्र‌भाऊ जगताप अध्यक्षीय भाषणात म्हणाले की जेव्हा शेतातून शेतमाल निघतो तेव्हा शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे परंतु शासन शेतमाल आयात करते त्यामुळे योग्य भाव मिळत नाही गेल्या एक दोन वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले आहे यावर्षी उत्पन्न बारापैकी वाटते शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे भाव मिळत नाहीं आडते व व्यापारी शेतकरी बंधुचे दुश्मन नाही वरून भावच नससल्या मुळे ते काय करणार याला जबाबदार शासन आहे, असे शुभारंभ प्रसंगी बोलत होते 

तसेच समितीच्या सभापती सौ कविता श्रीकांत गावंडे यांनी आज नवीन वर्ष आहे शेतकरी आडते व्यापारी मापारी हमाल मदतनीस बंधूंना नवीन वर्षाच्या शुभेच्या देऊन आपला शेतमाल बाजार समिती मध्ये किंवा शासनालाच विक्री करावा असे आवाहन केले 

या कार्यक्रमाल प्रामुख्याने जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बबनराव मांडवगणे तालुका काँग्रेस चे अध्यक्ष पंकज वानखेडे समितीच्या उपसभापती सौ संगीता गाडे तसेच संचालक राधेश्याम चांडक गिरीश भुतडा मुकुंद मोहोरे भाऊराव बमनोटे संजय गाडे संजय धामंदे अवीन टेकाडे, आशिष शिंदे मुकेश राठी सुनील भोगे सतीश मोकाती बाजार समितीचे व्यापारी मनीष केला, संजय अग्रवाल, अबू अग्रवाल, प्रदीप कुचेरिया, राजेश गगण, कैलास राठी सचिन गागण, प्रेमकुमा टावरी, सचिन मुंदडा नंदलाल राठी, पवन लाहोटी, गोवर्धन राठी, गणेश पानपालिय संतोष लाहोटी, सुरेंद्र जयस्वाल दीपक राजनकर गोवर्धन राठी मुकेश पंपालिया रितेश राठी आशू कापसे मधुर राठी प्रदीप राठी अमोल हटकर हमाल मापारी मदतनीस बंधू तसेच बाजार समिती कर्मचारी दिनेश गोमासे संजय तुपसुंदरे नितीन मांडवगणे पवन श्रीखंडे आदी उपस्थित होते

आज उद्घाटनप्रसंगी मनीष ट्रेडर्सचे प्रा.मनीष केला यांच्या खरेदी मध्ये. 8111 रुपये प्रति भाव मिळाला

veer nayak

Google Ad