आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गाेडबाेले
आर्वी : दि. ०८/१२/२०२५ रोजी श्री संत संताजी जन्मोत्सव समिती, आर्वी तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री संत संताजी महाराजांची ४०१ वा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला होता. तसेच श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पालखीची पूजा अर्चना व आरती करून सकाळी ८ वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान आर्वी येथून शहरातून विविध मार्गाने काढुन गुरुनानक धर्मशाळा येथे भजन किर्तन व काल्याचे आयोजन करून समाप्त करण्यात आले हाेते. तसेच श्री संताजी महाराजांची रथयात्रा सायंकाळी ५ वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान विठ्ठल वार्ड, आर्वी येथून मुख्य आकर्षण श्री संताजी महाराज रथ, आकर्षित तेलघाना, नामावंत दिंडी,ए. एच. लाईट, आर्वी ए- १ धुमाल पार्टी, डीजे पार्टीच्या गजरात दाऊद नगर, श्री भिकाराम महाराज देवस्थान, यांच्या घरापासून, साठे किराणा, जगन गाठे यांच्या घरापासून, हांडे अंबिका डेलीनेट्स, गजू शिंगाणे यांच्या घरापासून, तेलंगराय मंदिर, तुकडोजी महाराज पुतळा, नाग मंदिर, रघुनाथ महाराज देवस्थान, बारुद वाला गल्ली, या मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली.



या शोभा यात्रेचे विविध मार्गाने जात असताना सर्व समाज बांधवांनी आपल्या घरासमोरील रांगोळ्या काढून या शोभा यात्रेचे पूजा अर्चना करून स्वागत केले. तसेच या कार्यक्रमांमध्ये सर्व समाज बांधवांनी हिरारीने सहभाग घेऊन या महोत्सवाचा आनंद लुटला व गुरुनानक मंगल कार्यालय येथे या शाेभा रात्रेची समाप्ती करण्यात आली. व महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करून आयोजक श्री संत संताजी जन्मोत्सव समिती आर्वी यांनी सर्व सहभाग घेणाऱ्या समाज बांधवांचे आभार मानले.










