कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आर्वी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..

0
45
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले

आर्वी : कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आर्वी येथे दिनांक 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून योग प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र सोनटक्के तर शिबिराचे मार्गदर्शक आर्वी शहरातील सुप्रसिद्ध योग शिक्षक श्री कलोडे सर तसेच त्यांचे सहकारी श्री ढोक सर श्री आगरकरजी उपस्थित होते. योगशिक्षक श्री कलोडे यांनी योगाचे महत्व सांगत असताना योगाची सुरुवात प्रथम भारतातूनच पतंजली योग गुरु यांच्यापासून तर अलीकडील रामदेव बाबा अशी योग गुरु परंपरा सुरू असल्याचे प्रतिपादन केले.

योगामुळे आपल्या शरीराला आयाम मिळून शरीर व मन आनंदी व निरोगी राहण्यास मदत करते याप्रसंगी त्यांनी योगाची सर्व प्रात्यक्षिके करून दाखवीली व या प्रात्यक्षिकामध्ये सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन शारीरिक शिक्षण विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने केले होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. गणेश मस्के यांनी तर आभार डॉ. नीरज केंढे यांनी मानले.

veer nayak

Google Ad