वर्धा, प्रतिनिधी/
वर्धा / आर्वी शहरात नॅशनल हायवे सारख्या रस्त्यावर वाढत्या अतिक्रमणामुळे पाहता पाहता अनेक अपघाती मृत्यू घटना उघड्या डोळ्यासमोर घडल्या असून सुद्धा प्रशासन व राजकीय नेते गांधारीच्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काहीतरी थातूरमातूर कारवाई करायची म्हणून प्रशासन साेंग करत आहे. मात्र प्रशासनाकडून अतिक्रमण वर कारवाई नसून नागरिकांच्या सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून सर्विस रोडला प्राधान्य नाही. मग आम्ही जीव वाचवायचे कसे? आर्वी शहरात अनेक नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे व सोशल मीडियावर हाेत असलेल्या नागरिकांची प्रशासनावर व राजकीय नेत्यांवर टीकात्मक चर्चा होत आहे, तरीही प्रशासनाला जाग नाही.
आई-वडिलांना ; शिक्षण घेत असलेल्या मुलांचा थेट सवाल ?
आई-बाबा आम्ही या रस्त्याने जायचे कसे जायचं तर कोणत्या बाजूने रोडच्या दोन्ही कडेला अतिक्रमण असल्यामुळे सर्विस रोड नसल्याने रस्त्यावरच मर्जीप्रमाणे गाड्या उभ्या करून देतात प्रशासन सुद्धा मुंग गिळून बसलेल आहे. अशा निष्क्रिय प्रशासनामुळे इतर वाहतुकीसही अडचण निर्माण होत आहे. त्यातच रस्त्याने जात असतांना जीव मुठीत घेऊन चालावं लागते मग आम्ही ट्युशन व शाळेत जायचं कसं?..
शहरातून नॅशनल हायवे रस्ता गेला असून त्या रस्त्याला सर्विस रोडच नाही. आर्वी-तळेगाव व आर्वी-देऊरवाडा याच वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर आतापर्यंत निष्पाप जीव गेल्याच्या अनेक घटना घडल्या असून अद्यापही प्रशासन गांधारीच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. न्याय मागव तरी कुणाला मुलांनी केलेल्या प्रश्नाच उत्तर द्यायचं कसं अनेक नागरिकांच्या समोर माेठा प्रश्न निर्माण झालेला आहे.

घटना घडल्या की प्रशासनाची थातूरमातूर कारवाई दडपण कोणाचे ?
मागील वर्षी असाच एक आर्वी-तळेगाव रोडवर निष्पाप मुलीचा अपघाती मृत्यू झाला हाेता. असेच त्या मृत्युने प्रशासनही जागं झालं हाेत. मात्र नॅशनल हायवे रस्त्यावरच अतिक्रमण न काढता शिवाजी चौक ते गांधी चौकातल्या रस्त्यावरचे व आतील नेहरू मार्केट,इंदिरा चौक आत मधले तातडीने अतिक्रमण काढण्यात आले होते. मात्र काही राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करून ती होत असलेली अतिक्रमण कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु नॅशनल हायवे ला सर्विस रोड नसल्याने रोड अपुरा पडत असून सुद्धा अजूनही भर रस्त्यावरचे अतिक्रमण हटवण्यात आलेले नाही, अखेर याला जबाबदार कोण?
भर रस्त्यावर वाढत्या अतिक्रमणावर प्रशासनाचा लागतोय ब्रेक कारण काय?

नियमबाह्य येत असलेले अतिक्रमण वाचवण्याच्या प्रयत्नातून काही राजकीय नेते नॅशनल हायवे संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन आपल राजकारण टिकून ठेवण्याकरिता किंवा वैयक्तिक संबंध जपण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? शहरातल्या मुख्य रोडवरच्या वाढत्या अतिक्रमणावर प्रशासन योग्य निर्णय घेतील का? अशा या कारवाईला राजकीय नेते साथ देतील का? सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्वी शहरातील नागरिकांचा प्रशासनावर व राजकीय नेत्यांवर प्रश्नार्थक चिन्हाचा वर्षाव होत असल्याचे दिसत आहे.
आठ वर्ष होऊन सुद्धा आर्वी-तळेगाव रोड पूर्णत्वास गेलेला नाही. मग बायपास केव्हा होणार? शहरातून गेलेल्या नॅशनल हायवे रस्त्याचे काम प्रशासनाने पोलीस प्रोटेक्शन घेऊन मनमर्जीप्रमाणे डिव्हायडर अरुंद करून सुद्धा सर्विस रोड केला नाही. तसेच आर्वी-देऊरवाडा रोड लहान करून रोडच्या दोन्ही साईडला अतिक्रमण असल्याने सायकल व पायदळ चालण्या करिता नागरिकांना सुरक्षित रस्ता नाही. प्रशासन डोळे झाक करून दुर्लक्ष करत आहे.
पंकज गोडबोले
(सामाजिक कार्यकर्ते.)
आर्वी-तळेगाव रोडवर शाळा, कॉलेज व शासकीय कार्यालय असल्याने विद्यार्थ्यांना व नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून सर्विस रोड द्या या आर्वी शहराला दोन आमदार व एक खासदार लाभले असून सुद्धा मुख्य रस्त्यावरचा अतिक्रमण व सर्विस रोडचा तिढा सुटत का? नाही. प्रशासनही टाळाटाळ करत असल्याचे दिसत आहे.
प्रा. डॉ. सुधाकर भुयार
(शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी, आर्वी)












