श्री विठोबा संस्थान,सावंगा विठोबाचे विश्वस्तपदी प्रविण कुकडकर यांची नियुक्ती

0
292
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे : तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि कापुराची यात्रा म्हणून ओळख असलेल्या सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दि.२१/६/२०२५ रोजी विश्वस्त मंडळाची सामान्य सभा संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. संस्थानचे विश्वस्त स्व. अनिल बेलसरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर प्रविण नानाजी कुकडकर यांची बहुमताने निवड करण्यात आली.

या निवडीमुळे ग्रामस्थ आणि संस्थान भक्तांतून समाधान व्यक्त होत आहे. नियुक्ती प्रसंगी संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल, तसेच सर्व विश्वस्त विनायक पाटील, वामन रामटेके, गोविंद राठोड, चरणदास कांडलकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर आणि स्वप्नील चौधरी उपस्थित होते.

नवीन विश्वस्त प्रविण कुकडकर यांचे पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. त्यांच्या सहभागामुळे संस्थानच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यात नवा उत्साह आणि गती निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

veer nayak

Google Ad