अमरावती – शहरी आरोग्य केंद्र हमालपुरा अतर्गत असलेल्या माया नगर आरोग्य वर्धनी केंद्र च्या वतीने डॉ.विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनपा अमरावती तसेच डॉ .शरद जोगी जिल्हा हिवताप अधिकारी अमरावती यांच्या सूचनेनुसार तसेच डॉ.रुपेश खडसे साथ रोगअधिकारी महानगरपालिका अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे शहरी आरोग्य केंद्राच्या स्त्री वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसी मुरके,आरोग्य निरीक्षक हैदर अली यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी नगर,मत्स्यगंधा कॉलनी ,माया नगर ,कुंभारवाडा, गोपाल नगर येथील परिसरात डेंगू जनजागृती तसेच पर्यावरण दिनानिमित्त रॅलीच्या मार्फत नागरिकांना घोषणा द्वारे डेंगू प्रतिरोधक उपायोजना तसेच पर्यावरण स्वच्छता रॅली द्वारे माहिती देण्यात आली.यात नागरिकांना घोष वाक्य द्वारे डेंगू प्रतिबाधत्मक उपाययोजना अंतर्गत माहिती देण्यात आली त्याचप्रमाणे पर्यावरण दिन सुद्धा साजरा करण्यात आला या कार्यप्रसंगी मधुकर शिंदे सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे डॉ.रुपेश खडसे साथरोग अधिकारी यांनी डेंगू आजारावर प्रतिबंधात्मक उपाय बद्दल माहिती दिली आजाराबद्दल सतर्क राहण्याचे सूचना दिल्या या कार्यक्रमासाठी आरोग्य निरीक्षक हैदर अली ,विकास नकाशे ,रुपम खांडेतोड,बबन खंडारे,पद्माकर बरडे, शरद सावळे ,शशिकांत जैस्वाल,रामप्रसाद बांगर, प्रतीक जोशी,अंकित कवीश्वर,विकी भांडेकर ,विजय चव्हाण,श्रेयस नाडे ,इमरान खान,क्षीरसागर,उमेश जाधव,रुपेश घोरे,जेठे, सरनाईक,निलेश लाडे,राजेश धीगर,ज्ञानेश्वर शिंदे,मसूद खान,मोहम्मद शकील,महमंद अयफाजुद्दीन,निखिलेश गार पवार,विवेक चोपडे,विशाल शिंदे. सर्व आरोग्य सेवक,आरोग्य सेविका आशा वर्कर उपस्थित होत्या