दिनांक 15 मार्च 2026 ला ग्रामपंचायत कार्यालयात उत्तम कापूस प्रकल्प शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये ग्राम जीवन्नोती अभियाना अंतर्गत जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच तथा ग्रामपंचायत प्रशासक रूपाली गायकवाड तर प्रमुख मार्गदर्शिका म्हणून पपीता मनोहरे, प्रमुख अतिथी गायत्री चरडे मॅडम बी.सी प्रकल्प, वृंदा सरडे अध्यक्ष आदिसंघ, सुनंदा मसराम स्त्री शक्ती ग्राम संघ त्या होत्या कार्यक्रमाची संचालन ज्योती बांगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सरिता बंड यांनी केले यावेळी प्रमुख मार्गदर्शकांनी स्त्री ही आत्मनिर्भर होण्यासाठी तिने स्वबळावर उद्योग निर्माण करावे,


आणि ज्ञान संपादन करण्यासाठी शिक्षणावर भर द्यावी असे मार्गदर्शन केले याच कार्यक्रमाच्या दरम्यान येथील भाग्यश्री पांडे या महिलेचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करून भेटवस्तू देण्यात आली भाग्यश्रीने हस्तकलेच्या वस्तू चा स्टॉल अमरावती येथील विज्ञान प्रदर्शनी मध्ये लावला असून त्या वस्तूची उत्तम प्रकारे विक्री करण्यात आली आणि त्यामुळे गावाचे नाव लवकर झाले. हा कार्यक्रम यशस्वीतीसाठी संध्या ठाकरे सीआरपी, उर्मिला झाडे, विजया मोहनकर त्यांनी अथक परिश्रम घेतले















