विद्यानिकेतन स्कूलची प्रिशा आशिष राठी व चार्वी रवी पनपालिया या विद्यार्थिनींना राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत घवघवीत यश

0
18

धामणगाव रेल्वे

अखिल नटराजम आंतर-सांस्कृतिक संघ, नागपूर व आंतरराष्ट्रीय नृत्य परिषद (CID, पॅरिस – फ्रान्स) यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे आयोजित झालेल्या अखिल भारतीय २० व्या सांस्कृतिक राष्ट्रीय नृत्य स्पर्धा व महोत्सवात विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. इयत्ता ४ ची कु. प्रिशा आशिष राठी व इयत्ता ५ ची कु. चार्वी रवी पनपालिया या विद्यार्थिनींनी कनिष्ठ वयोगटातील भारतीय शास्त्रीय कथक नृत्य प्रकारात सहभाग घेऊन राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेत भारतातील कथ्थक नृत्य प्रकारामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत धामणगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यशाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल प्रिशा राठी व चार्वी पनपालिया यांचा शाळेचे प्राचार्य रवी देशमुख व उपप्राचार्य साई निरजा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेचे संचालक राजेंद्र जोशी यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

veer nayak

Google Ad