महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र धामणगाव रेल्वे येथे आज सकाळी आंतरराष्ट्रीय कामगार दीन आणि महाराष्ट्र दीन कार्यक्रम निमित्त परिसंवाद आणि उत्कृष्ट कार्या बद्दल कामगारांचा सत्कार कार्यक्रम जवाहर सूत गिरणी ,धामणगाव येथे घेण्यात आला,



सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मां श्री. विजयजी उगले ( उप अध्यक्ष, जवाहर सूत गिरणी ) , प्रमुख पाहुणे मां श्री. पी. के. जेना ( महाव्यवस्थापक जवाहर सूत गिरणी) .प्रमुख वक्ते मां.प्रा.डॉ. विशील मोकासे ( प्रा. आदर्श महाविद्यालय धामणगाव) व प्रा. डॉ. मां.दीपक आटे ( प्रा. सावित्री जोतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयात, यवतमाळ) उपस्थीत होते, तर प्रमुख पाहुणे मां.सौ. ज्योती पाटील ( भा. ज. पा. महामंत्री) , मां श्री. सच्चिदानंद काळे ( ज्येष्ठ पत्रकार) , मां.श्री. साहेबराव भोसले(सामाजिक कार्यकर्ते) हे उपस्थित होते, या कार्यक्रमात सत्कार मूर्ती मां.श्री. कृपाल सिंह पवार( खामगाव अर्बन बँक), मां.श्री. संतोष पोल ( नवदुर्ग सहकारी को ऑपरेटिव्ह, पथ बँक) , मां.श्री.सुनील रामभाऊ चौधरी ( वाहक , चांदूर बाजार डेपो) , मां.श्री. राजेश जंगले ( जवाहर सूत गिरणी) ,मां सौ. उज्ज्वला ढोले( जवाहर सूत गिरणी) , मां.श्री.नितीन विजय जैस्वाल ( वीज वितरण कंपनी, यवतमाळ) हे उपस्थित होते, सदर कार्यक्रमात शाल, श्रीफळ, memonto, पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ.सविता पवार,प्रास्ताविक गजानन सोनटक्के ( केंद्र संचालक) तर आभार मां श्री. पराग अनवाणी यांनी मानले, सदर कार्यक्रमाला कामगार महिला पुरुष 150 ते 200 उपस्थीत होते.













