दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी, राजर्षी शाहू सायन्स कॉलेज आणि राजर्षी शाहू सायन्स व अतूल जगताप आर्ट्स जूनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंती निमित्त “Savitribai Phule: A Legacy of Empowerment” या थीमवर विद्यार्थिनींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धांमध्ये एकांकिका (मी सावित्रीबाई फुले बोलतेय), म्युझिकल ड्रामा, वूमन आयकॉन्स शोकेस अशा विविध प्रकारच्या स्पर्धा होत्या. या स्पर्धांमध्ये एकूण 40 विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्येकाने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील शिक्षणप्रेम, समाजसेवा आणि संघर्षाची कहाणी प्रभावीपणे सादर केली.या कार्यक्रमात विविध स्पर्धांव्यतिरीक्त, एकांकिकेत विद्यार्थिनीनी सावित्रीबाई बोलतेय या भूमिकेतून त्यांच्या जीवनातील संघर्ष, शिक्षणप्रेम व समाजसेवेचे दर्शन घडवले. त्याचबरोबर, “वूमन आयकॉन्स शोकेस” मध्ये 12 विद्यार्थिनींनी आदर्श महिला नेतृत्त्वाच्या उदाहरणांनी देश-विदेशातील महिलांची झलक दाखवली. राणी लक्ष्मीबाई, डॉ. आनंदी जोशी, इंदिरा गांधी, अहिल्याबाई होळकर, रामाई, जिजामाता अशा महान स्त्रियांच्या वेशभूषेत त्यांची माहिती दिली.


कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पराग वडनेरकर सर होते. त्यांनी स्त्रीच्या प्रगतीबद्दल भाषणात सांगितले की, “आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे, विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंचे विचार जीवनात रुजवावेत.” त्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनातील कथा व समाजसेवेवर प्रकाश टाकला. याप्रसंगी IQAC समन्वयक प्रा. सुरेंद्र वाणी, परीक्षक म्हणून प्रा. डॉ. अमोल ठाकरे, सहायक प्राध्यापक , रसांयशास्त्र विभाग व प्रा. डॉ. प्रविण सरदार, सहायक प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग हे उपस्थित होते. सर्व अतिथींनी विद्यार्थिनींचे कौतुक करून त्यांचा उत्साह वाढवला.
कार्यक्रमाचे आयोजन वुमन सेलच्या समन्वयिका प्रा. डॉ. संपदा पाथरकर तसेच सहसमन्वयिका प्रा. रेखा केने, प्रा. रोशनी भगत, प्रा. ममता पळसपगार व सखी सावित्री समितीचे समन्वयिका प्रा. एस. एम. देशमुख यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी, विद्यार्थिनींनी या प्रेरणादायी कार्यक्रमातून शिक्षण व समाजसेवेची दिशा मिळाली, हीच खरी जयंती साजरी करण्याची भावना वाटली.या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन बीएससी भाग एक ची विद्यार्थिनी कु. तनुश्री बनसोड ने केले.











