तिवसा मतदार संघाचे आमदार मा श्री राजेशजी वानखडे यांच्या अभिष्ठ चिंतन ,वाढदिवसाच्या निमित्त्याने दि २८ मार्च २०२६ रोजी अमरावती येथे आयोजित पोलिस पाटील परिषद २०२६ कार्यक्रमात पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यां संदर्भात मार्गदर्शनपर आपले विचार व्यक्त करतांना महसुलमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी अमरावती येथिल पोलीस पाटील संघ चे शिष्ट मंडळास दि ७ एप्रील २०२६ ला मंत्रालय मुंबई येथे मा मुख्यमंत्री महोदय यांचे सोबत बैठक आयोजित करण्या संदर्भात चर्चा करण्या अनुषंगाने यावे असे पोलीस पाटील परिषदेत मार्गदर्शन करतांना सांगीतले.पाटील संघ अमरावती यांच्या वतीने जिल्ह्यातील प्रातिनिधिक स्वरूपात ९ पोलीस पाटील यांचे शिष्टमंडळ मुंबई येथे उपस्थित राहून महसुल मंत्री मा चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना पोलीस पाटील यांच्या विविध मागण्यांची पुर्तता करणेहेतू मा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनात बैठक आयोजीत करण्यात यावी त्या करिता राज्यसभा खासदार मा श्री अनिलजी बोंडे साहेब,तिवसा मतदार संघाचे आमदार मा श्री राजेश वानखडे यांचे उपस्थिती मध्ये भेट घेऊन चर्चा करून यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी मुंबई येथे लवकरच पोलीस पाटील यांचे सेवानिवृत्ती वय वाढ ६० वरून ६५ या प्रमुख मागणी संदर्भात व ईतर प्रलंबित मागण्यां संदर्भात मा मुख्यमंत्री यांचेकडे बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात आली.
निवेदन देतेवेळी, पोलीस पाटील संघ अमरावती शिष्टमंडळ मध्ये श्री किशोर सावंत पाटील श्री प्रदिप राऊत पाटील श्री रामेश्वर चौखंडे पाटील श्री रुपेश उईके पाटील श्री भाग्येश इंझळकर पाटील श्री नानकराम कासदेकर पाटील,श्री शिवानंद पाटील विभागीय अध्यक्ष, श्री प्रकाश भारसाकळे पाटील,श्री राहुल पाटील सावरकर अध्यक्ष पोलीस पाटील संघ महाराष्ट्र राज्य यावेळी उपस्थित होते.
















