पीएमश्री गांधी विद्यालयात एनसीसी छात्र सैनिकांचा सत्कार व बक्षीस वितरण सोहळा संपन्न

0
11
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले

आर्वी : एनसीसी छात्र सैनिकांना भविष्यात वेगवेगळ्या क्षेत्रात असंख्य संधी उपलब्ध – सुभेदार विनोद कुमार

जर तुम्ही आत्मविश्वासाने आणि मेहनतीने कुठले क्षेत्रात गेले तर यश हे तुमचेच आहे – तेजस देशमुख फोर्स वन कमांडो

नवनिर्वाचित नगराध्यक्ष माननीय स्वाती प्रकाश गुल्हाने यांचा सत्कार करण्यात आला

एनसीसी 2025 बॅच चा 100 टक्के निकाल स्थानिक पीएमश्री नगरपरिषद गांधी विद्यालयात दिनांक 30 डिसेंबर ला सकाळी 11 वाजता ड्रॉइंग हॉलमध्ये एनसीसी छात्र सैनिकांचा सत्कार व बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष आर्वी नगरपरिषद च्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष माननीय स्वाती प्रकाश गुल्हाने या होत्या त्यांचा शाळेच्या आणि एनसीसी विभागातर्फे शाल ,श्रीफळ, पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच 21 महाराष्ट्र बटालियन वर्धा तर्फे आलेले भारतीय सेनेमधील सुभेदार पदावर असलेले विनोद कुमार सर हे प्रमुख अतिथी होते. तसेच प्राचार्य ,पर्यवेक्षिका मॅडम आणि विद्यालयाच्या माजी विद्यार्थी जे एनसीसी छात्र सैनिक होते तेजस दिनेश देशमुख यांच्या सुद्धा सत्कार करण्यात आला जो आता फोर्स वन कमांडो मुंबई येथे कार्यरत आहे. तसेच माजी एनसीसी छात्र सैनिक असलेली कु. वैष्णवी कैलास कुऱ्हाडे जिने

नुकतेच संत गाडगे महाराज अमरावती युनिव्हर्सिटी मधील एम .एस. सी .कम्प्युटर सायन्स मध्ये पाच जिल्ह्यातून गुणवत्ता यादीत प्रथम स्थान मिळवले तिचा सुद्धा एनसीसी विभागाच्या वतीने आणि शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच 2025 मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांमधून अल्फा ग्रेड ज्यांना मिळालेला आहे असे रुद्र सातपुते ,हितेश शिरपूरकर, रुद्राक्ष दिघडे ,कु.भक्ती रुद्रकार आणि इशिका मेहेरकुरे यांना सुद्धा एनसीसी विभागातर्फे स्मृतिचिन्ह ,प्रमाणपत्र ,गुलाब पुष्प देण्यात आले. एनसीसी छात्र सैनिक हे दोन वर्ष मेहनत करतात त्यांची पाचशे मार्काची परीक्षा ही बटालियन तर्फे घेतली जाते 2025 मध्ये जेवढे विद्यार्थी बसले होते ते सर्व पास झाले त्या सर्वांनाच मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच यावर्षी ज्यांनी कॅम्प मध्ये बेस्ट फायर अवार्ड मिळवलेला आहे त्यामध्ये कु.माही आसोले, कु. आरुषी शाहू ,धावण्याच्या शर्यतीमध्ये वेदिका गोरले आणि जो राष्ट्रीय शिबिर झाले त्यामध्ये वैष्णवी राऊत आणि समृद्धी ढेंबरे हिला सुद्धा एनसीसी विभागाच्या वतीने पारितोषिक देण्यात आले आणि त्यांचा सत्कार करण्यात आला.

सुभेदार विनोद कुमार यांनी विद्यार्थ्यांना भविष्यामधील भारतीय सेनेमधील एनसीसी छात्र सैनिकांना कशाप्रकारे संधी उपलब्ध आहेत यावर सखोल मार्गदर्शन केले .तसेच फोर्स वन कमांडो तेजस देशमुख यांनी आपल्या एनसीसीच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या विद्यार्थ्यांना सांगितल्या आणि मेहनत जर केली तर आपण किती मोठ्या पदावर जाऊ शकतो हे सांगितले पर्यवेक्षिका ज्योतीताई अजमेरे मॅडम यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि प्राचार्य श्री विश्वेश्वर पायले सरांनी विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये शाळेकडून कोणकोणत्या गोष्टी मिळतील जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास होईल यावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक संजय कीटे यांनी केले.

veer nayak

Google Ad