सावंगा (विठोबा) येथे माघ अमावस्या निमित्त चंदन उटी उत्सव व चैत्र मास मांड कार्यक्रमाचा शुभारंभ

0
18

चांदूर रेल्वे (प्रतिनिधी):- अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे माघ मास अमावस्या निमित्त चंदन उटी उत्सव तसेच चैत्र मास अखंड जागृती भजन मांड कार्यक्रमाचा शुभारंभ आयोजित करण्यात आला आहे.

श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान यांच्या वतीने दि. १७ फेब्रुवारी २०२६, मंगळवार रोजी दुपारी ३.३० वाजता संस्थान परिसरात भक्तिभावपूर्ण वातावरणात चंदन उटी उत्सव संपन्न होणार आहे. या प्रसंगी चंदनउटी नंतर बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन संस्थानच्या अन्नदान समितीमार्फत करण्यात आले आहे.

याच दिवशी पहाटे ५.०० वाजता संस्थानतर्फे चैत्र मास निमित्त आयोजित अखंड जागृती भजन मांड कार्यक्रमाचा शुभारंभ लहान मंदिरात ढाल बसवून होणार असून,मुख्य मंदिरात कृष्णाजी महाराजांचे गण सुमरनाने विश्वस्त मंडळ व भाविक भक्तांच्या उपस्थितीत भजनाचा गजर सुरू होईल.या मांडीत सहभागी अवधूत भजन मंडळाची संस्थान तर्फे दैनंदिन भोजन,चहा व नास्ता इ.व्यवस्था करण्यात आली आहे आणि सहभागी मंडळांना महाराजांची गाथा,संस्थानची टोपी व सन्मान पत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे. 

 दरम्यान, यावर्षी होणाऱ्या गुढीपाडवा यात्रा महोत्सवाच्या सुयोग्य नियोजनासाठी विश्वस्त मंडळाची सामान्य सभा नुकतीच पार पडली असून यात्रेच्या पूर्वतयारीला सुरुवात करण्यात आली आहे. या गुढीपाडवा यात्रा महोत्सवात बाहेर गावातील अवधूत भजन मंडळांचे वाहनांना दि.१८ मार्च २०२६ रोजी सायंकाळ पर्यंत संस्थानचे अधिकृत पत्रा आधारे प्रवेश दिला जाईल,या करिता अवधूत भजन मंडळांनी यात्रेपू्र्वी संस्थानचे पत्र प्राप्त करून घ्यावेत आणि कायदा सुव्यवस्थेकरिता संस्थान आणि शासनाला सहकार्य करावे. 

भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची नियमित बससेवा उपलब्ध आहे.

चांदूर रेल्वे बसस्थानकातून: सकाळी ९.००, १०.००, दुपारी ३.०० व सायंकाळी ७.१५

अमरावती बसस्थानकातून: सकाळी ७.३० व सायंकाळी ५.४५भाविकांनी अवैध वाहनांचा वापर टाळून अधिकृत बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल तसेच विश्वस्त विनायक पाटील, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, प्रविण कुकडकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्निल चौधरी यांच्यासह समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

veer nayak

Google Ad