झाडगाव चिंचोली येथील नदीकाठावर अवैधपणे रेतीचे मोठमोठे ढिगारे तयार करण्यात आले असून प्रशासनाचे याकडे उघडपणे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दिवसाढवळ्या रेतीचे उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जात आहे.
नदीकाठावर झालेल्या या अवैध उत्खननामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून नदीपात्र धोक्यात आले आहे. प्रशासनाने या अवैध रेती माफियांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अवैध रेती उत्खननावर कारवाई न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाचा इशारा देत आहेत.












