विज्ञान शिक्षकांच्या अभावामुळे वेणी गणेशपूर शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

0
56

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जि.प. पूर्व माध्यमिक शाळा, वेणी गणेशपूर येथे विज्ञान विषयाच्या शिक्षकांचा अभाव निर्माण झाल्याने इयत्ता ६ वी व ७ वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे कु. अर्चना गंजीवाले (विषय शिक्षक) यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना मूळ पदावर वेणी गणेशपूर येथे कार्यरत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

माहितीनुसार, जि.प. पूर्व माध्यमिक शाळा, वेणी गणेशपूर येथे इयत्ता ६ वी व ७ वी साठी केवळ दोन विषय शिक्षक उपलब्ध आहेत. त्यापैकी विज्ञान विषयाचे पद सध्या रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित अध्यापन मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, विज्ञान विषयाच्या शिक्षक असलेल्या कु. अर्चना गंजीवाले यांची प्रतिनियुक्ती पिंपळगाव निपाणी येथे करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन कु. अर्चना गंजीवाले यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना जि.प. शाळा, वेणी गणेशपूर येथे मूळ पदावर परत पाठविण्याची मागणी संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शिक्षण विभागाने या प्रकरणात लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा पालक व ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

veer nayak

Google Ad