गेल्या सहा ते सात वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियान अनेक प्रकारचे उपक्रम राबवून समाजामध्ये सामाजिक धार्मिक आणि राजकीय बदल घडवून यावा यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवतात परंतु यावर्षी अभियानाचे पदाधिकारी विमानाने प्रवास करून डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमी येथे अभिवादन करणार असल्याचे अभियानाचे जिल्हा संघटक नितीन टाले यांनी यावेळी सांगितले.
अभियानाच्या माध्यमातून एक दिवसीय शिबिर, पाच दिवसीय शिबिर, श्रामनेर शिबिर, दीक्षाभूमी येथे गेल्या सहा वर्षापासून शिदोरी या नावाने भोजनदान मोठ्या प्रमाणात केल्या जाते. नागपूर ते भीमा कोरेगाव अभिवादन रॅलीचे आयोजन तसेच यावर्षीपासून प्रत्येक गावामध्ये वर्षावासाच्या कालावधीमध्ये ग्रंथाचे पठण प्रत्येक विहारांमध्ये होते परंतु त्या वाचकाचा कोठेही मान सन्मान केल्या जात नाही परंतु या अभियानाने ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक वाचकाचा सन्मान व्हावा यासाठी ग्रंथवाचक सन्मान सोहळ्याचे आयोजन यावर्षी प्रत्येक गावामध्ये केले होते.
तसेच दीक्षाभूमीवर रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासाठी हे अभियान यांचे कार्य प्रगतीपथावर असल्याचेही यावेळी सांगितले.
बाबासाहेबाच मुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये जगण्याची एक उमीद निर्माण केल्या गेली ती उमेद बाबासाहेबांना विचार आणि प्रेरणा घेऊन प्रत्येक गावामध्ये धम्म चळवळ मोठ्या प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियान राबवत आहे. परंतु अभियानाने एक समाजापुढे बौद्ध समाज पुढारलेला आणि वैचारिक दृष्टीने मोठ्या प्रमाणात संपन्न असल्याचे अनेक दाखले आपल्याला पहावयास मिळतात परंतु याही पलीकडे सर्वसामान्य माणूस हा विमानाने प्रवास करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी स्वतःच्या पैशाने जातो ही इतरांपुढे एक आदर्श ठरावा यासाठी आयोजन असल्याचेही यावेळी मुख्य संयोजक जगदीश शिंदे यांनी सांगितले.
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला सर्वसामान्य व विशेष करून ग्रामीण भागातील हे सर्व पदाधिकारी आहे.
समाजामध्ये एक नाव चैतन्य निर्माण व्हावी व बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन प्रत्येक माणूस पुढे चालला पाहिजे यासाठी या बाबासाहेबांना अभिवादन सोहळ्याचे विमानाने प्रवास करून आयोजन केले आहे.
नितीन टाले जिल्हा संघटक अमरावती