एस ओ एस कब्स धामणगाव (रेल्वे) येथे दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा…..

0
46
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

दिनांक :१६/१०/२०२५

एस. ओ. एस. कब्स येथे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. दिवाळी हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला येतो. या दिवशी माता लक्ष्मीचे पूजन केले जाते व घरोघरी दिवे लावतात. रांगोळी काढतात. घरांची सजावट करतात. नर्सरी ची विद्यार्थिनी मनस्वी खडसे ही माता लक्ष्मी च्या वेशभूषेत आली होती प्रि प्रायमरी हेड मा शबाना खान यांनी माता लक्ष्मी च्या मूर्तीचे पूजन केले* प्री. प्रायमरी हेड मा. शबाना खान आणि शिक्षिका आकांक्षा महल्ले यांनी दिवाळी विषयी माहिती सांगितली दिवाळी हा सण भारतीय संस्कृतीमधील एक प्रमुख सण असून, अंध:कारावर प्रकाशाचा, असत्यावर सत्याचा आणि दृष्टा वर सज्जन्तेचा विजय दर्शवणारा हा सण आहे. भगवान श्रीराम यांनी १४ वर्षाच्या वनवास नंतर रावणाचा वध करुन अयोध्येत परत येताच अयोध्या वासियानी दिवे लावुन त्यांच्या स्वागताचा सोहळा साजरा केला आणि तेव्हापासूनच दीपावली साजरी करण्याची परंपरा सुरू झाली . दिवाळी निमित्याने शाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले त्यामध्ये वर्ग के जी २च्या विद्यार्थ्यांनी आकाशदिवे तयार करणे, वर्ग के जी १ मध्ये स्पांज प्रिंटिंग च्या साहाय्याने दिवा तयार करणे, आणि नर्सरी मध्ये बटाटा प्रिंटिंग च्या साहाय्याने दिवा तयार करणे. वर्ग के जी २ च्या विद्यार्थिनींनी दिवाळी निमित्त छान असे नृत्य सादर केले .

प्रि प्रायमरी हेड मा. शबाना खान यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की दिवाळी हा सण दिव्यांचा नसून अंध:कारातून प्रकाशाकडे नेणारा, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा सण आहे तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले की आपल्या दिवाळी सोबतच आपण गरजु लोकांची दिवाळी साजरी करावी त्यांना मदत करावी सुरक्षितता बाळगून आणि आपल्या सभोवतालच्या सर्वांची , प्राण्यांची काळजी घेवून दिवाळी साजरी करावी असे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

 प्रि. प्रायमरी हेड मा. शबाना खान यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका प्रणिता जोशी, रेणुका सबाणे, वर्षा देशमुख, आकांक्षा महल्ले, विशाखा मेंढे, श्रद्धा रॉय, अश्विनी नांदणे , स्नेहल दुर्गे यांनी सहकार्य केले.

veer nayak

Google Ad