धामणगाव रेल्वे – आगामी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मध्ये अपक्ष उमेदवार प्रवीण बबनराव रोहनकर यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा असून स्थानिक नागरिकांसह युवकांचा या उमेदवाराला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रवीण रोहनकर हे गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय असून प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी शहराध्यक्ष म्हणून त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. मॉर्निंग क्लबद्वारे 30 वर्षांहून अधिक काळ केलेल्या कार्यामुळे त्यांचा जनसंपर्क मजबूत असून नागरिकांशी घट्ट नातं निर्माण झालं आहे.
गोरगरिबांच्या मदतीला तत्पर धावून जाणे, प्रभागातील प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे आणि युवकांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत यामुळे ते युवकांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. “काम करणारा नेता हवा” या भावनेतून अनेक युवक त्यांचे समर्थन करत असल्याची माहिती स्थानिक पातळीवर मिळाली आहे.
धामणगाव रेल्वेच्या दहा प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक 5 हा सर्वाधिक चर्चेत असून येथे बदलाची मागणी जोर धरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. “या वेळी प्रभागासाठी काम करणारा उमेदवारच हवा,” असा सूर व्यक्त करत नागरिक प्रवीण रोहनकर यांच्या बाजूने कल दर्शवत आहेत.
स्वच्छता, सुरक्षितता, प्रभागातील सुविधा आणि नागरिकांच्या अडचणींना प्राधान्य देण्याची भूमिका मांडत प्रवीण रोहनकर यांनी मतदारांसमोर आपला विकासाचा संकल्प ठेवला आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असताना कोणत्याही पक्षीय दबावापेक्षा केवळ जनतेची सेवा हाच आपला उद्देश असल्याचा त्यांचा दावा आहे.
प्रभाग क्रमांक 5 मध्ये अंतिम टप्प्यातील प्रचार अधिक रंगतदार होत असून मतदार कोणावर विश्वास ठेवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










