नांदगाव खंडेश्वर येथे ‘क्रांतीसूर्य बिरसा मुंडा प्रवेशद्वार’ उभारण्याची मागणी; नगरसेविका प्रांजली गुल्हाने यांचा पुढाकार          

0
14
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

नांदगाव खंडेश्वर : थोर आदिवासी स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या गौरवार्थ नांदगाव खंडेश्वर शहरात भव्य ‘प्रवेशद्वार कमान’ उभारण्यात यावी, अशी मागणी प्रभाग क्रमांक १४ च्या नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांनी नगर पंचायतीकडे केली आहे. यासंदर्भात आगामी सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून कामाला गती देण्याची विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या स्मृती कायम जतन व्हाव्यात आणि येणाऱ्या पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने प्रभाग क्र. १४ मधील मुख्य रस्त्यावरील पुलाजवळ हे भव्य ‘बिरसा मुंडा प्रवेशद्वार’ उभारण्यात यावे, अशी भूमिका सौ. प्रांजली गुल्हाने यांनी मांडली आहे. 

शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या या प्रस्तावित प्रवेशद्वारामुळे बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वारसा जोपासला जाईल. या मागणीला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून, नगर पंचायतीच्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होऊन त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

veer nayak

Google Ad