एस. ओ.एस कब्स बुधवार बाजार रोड धामणगाव रेल्वे येथे गुढीपाडवा हा विजय, नवनिर्मिती आणि मराठी संस्कृतीचा सण आनंंदात साजरा…

0
24
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

दिनांक : १८/ ०३/ २०२६ एस ओ एस कब्स येथे गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला येणारा हा दिवस नववर्षाची सुरुवात मानला जातो.

घराघरांमध्ये सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करून दरवाज्यावर गुढी उभारली जाते. रेशमी वस्त्र, कडुलिंबाची पाने, साखरेची गाठी आणि तांब्या किंवा चांदीचा कलश याने सजवलेली गुढी विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

      या दिवशी कडुलिंब-गूळ खाण्याची परंपरा आहे, ज्यामागे आरोग्य आणि जीवनातील गोड-तिखट अनुभव स्वीकारण्याचा संदेश दिला जातो. तसेच श्रीखंड-पूरी, पुरणपोळी यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतला जातो.

गुढीपाडवा हा सण नवीन सुरुवात, आनंद आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा आहे. अशी महत्वपूर्ण माहिती प्री. प्रायमरी हेड मा. शबाना खान आणि शिक्षिका प्रणिता जोशी यांनी दिली.

        या कार्यक्रमात नर्सरी च्या विद्यार्थीनी शार्वी शिवरकर आणि युतिका चरपे महाराष्ट्रीयन वेशभूषेत आल्या होत्या. मा.प्री. प्रायमरी हेड शबाना खान यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका प्रणिता जोशी, वर्षा देशमुख, रेणुका सबाने, आंकाक्षा महल्ले, विशाखा मेंढे, अश्विनी नांदणे,स्नेहल दुर्गे, ऋचा अलवाडकर यांनी सहकार्य केले

veer nayak

Google Ad