अमरावती आय टी आय येथे आज रोजगार मेळावा.

0
6

अमरावती, दि. 27 : स्थानिक संत गाडगेबाबा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण, संस्था, मोर्शी रोड, अमरावती येथे उदया बुधवार, दि. 28 मे रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विदर्भातील नामांकित कंपनी जाधव गिअर्स लिमिटेड, एम.आय.डी. सी., अमरावती व जाधव लेलँड प्रायव्हेट लिमिटेड व अन्य कंपन्या सहभागी होणार आहेत.

या मेळाव्यामध्ये वेल्डर, फिटर टर्नर, मशीनिस्ट या व्यवसायात आयटीआय उत्तीर्ण व यावर्षी परीक्षेला बसलेले प्रशिक्षणार्थी यांना संधी मिळणार आहे. सुमारे 300 जागांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. उपस्थित कंपनीच्या अधिकाऱ्यांमार्फत उमेदवाराची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. या मेळाव्यात, नुकतेच पास झालेले आयटीआय उत्तीर्ण, एक वर्ष किंवा दोन वर्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना अनुक्रमे दरमहा रु.9 हजार 500 रुपये ते 12 हजार रुपये प्रदान करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गरजू उमेदवारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या उपसंचालिका श्रीमती ठोंबरे तसेच उपप्राचार्य संजय बोरकर यांनी केले आहे.

veer nayak

Google Ad