सर्व शाखीय तेली समाज संघटना नगराध्यक्षा व नगरसेवकांचा सत्कार.

0
4

धामणगाव रेल्वे 

सर्व शाखीय तेली समाज संघटनेतर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार समारंभ श्री गजानन महाराज देवस्थान कोठारी नगर येथे घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा.डी.सी.कारमोरे सर उपस्थित होते सर्वप्रथम नगराध्यक्षा सौ.अर्चनाताई अडसड रोठे (आक्काताई) यांचा सत्कार सौ.सुवर्णा विलास बुटले व नवनिर्वाचित नगरसेवक विलास सुभाषराव बुटले यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार तेली समाज बांधवांनी व्यक्तिशः शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डी.सी.कारमोरे सर यांचा सत्कार अक्का ताईंनी शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. सुनील साकोरे व प्रणय राजनकर यांचाही सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. नवनिर्वाचित नगरसेवक गटनेते नरेंद्र चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व शाखीय तेली समाजाचे अभिनंदन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रशांत आसोले यांनी संचालन गोविंद कपिले यांनी व आभार प्रदर्शन सौ. पूजा अजय जीरापुरे यांनी केले .

कार्यक्रमाला अतुल बुटले, प्रशांत मेशराम, प्रफुल गुल्हाने, बोराखडे सर, हजारे सर,बच्छराज मेशराम, निवृत्ती लोखंडे, रवींद्र गायकवाड, अशोकराव नागरमोते, मंगेश चाफले, राजूभाऊ देवतळे, महेंद्र शेलोकर, उमेश शेलोकर, जय शेलोकर,हरिभाऊ बुटले,विजयराव बुटले, रमेशभाऊ साहू, बालूभाऊ बाबुळकर, वैरागडे सर,कृष्णाभाऊ बोंडणे, अशोकराव कुंजेकार, रवी मलवार बहुतांश समाज बांधव व भगिनी उपस्थित होते व इतर समाज बांधव सुद्धा उपस्थित होते.

veer nayak

Google Ad