धामणगाव रेल्वे
धामणगाव रेल्वे ,चांदुर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यात लक्षांक नसल्याने मागील अनेक वर्ष घरकुला पासून वंचित असलेल्या आदिवासी गोवारीना आता घरकुल मिळणार आहे आमदार प्रताप अडसड यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे
धामणगाव मतदार संघातील धामणगाव रेल्वे चांदुर रेल्वे नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यात आदिवासीं गोवारी कुटुंबांची संख्या सर्वाधिक आहे या कुटुंबांना माती कुळाच्या च्या घरात राहावे लागत असल्याची कैफियत आदिवासी गोवारी जमात संघटनेचे कार्याध्यक्ष कृष्णा चौधरी यांच्या पुढाकारात कार्यकर्त्यांनी आमदार प्रताप अडसड यांच्यासमोर मांडली.आदिवासी गोवारी समाज सध्या स्थितीत विशेष मागास प्रवर्गात येतो
इतर मागास बहुजन कल्याण विभागाने २७ सप्टेंबर २०२३ रोजी शासकीय अध्यादेश काढला मात्र लक्षांक कमी येत असल्याने अनेक आदिवासी गोवारी कुटुंबांना घरकुलापासून वंचित राहावे लागते असल्याचे कृष्णा चौधरी यांनी आ.प्रताप अडसड यांच्या लक्षात आणून दिले लगेच अडसड यांनी मंत्री अतुल सावे यांच्या शी संपर्क साधून मतदारसंघातील आदिवासी गोवारी कुटुंबांची घरकुलाबाबतची कैफियत मांडली जिल्ह्यात येणाऱ्या लक्षांकांमध्ये धामणगाव मतदार संघात अधिक लक्षांक येणाऱ्या काळात देणार असल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी निवेदन देताना मंगेश चौधरी प्रफुल ठाकरे अविनाश राऊत मनोज कुसराम हरीदास राऊल शंतनु नेवारे, आयुष चौधरी, विलास बगडते ,गजानन चौधरी उमेश पोगळेरामदास नेवारे संजय सोनोने प्रदीप वाघाडे उकडराव नेवारे मंदा नेवारे लिलाधर चौधरी,अरुण सोनोने शरद अबुडारे ,प्रज्वल चौधरी कैपेश कालसर्पे विशाल अबंडारे प्रविण सविता नेवारे निलेश नेवारे सचिन वाघाडे बादल वाघाडे भिमराव राऊत वेभव राऊत विलास बगळते. संतोष नेवारे. बंटी नेवारे. आकाश राऊत. गौरव चौध री. गौरव वाघडे. संदीप सहारे. संदीप सोनवणे. भाऊराव चौढरी. दिलीप चौधरी.प्रमोद मेश्राम. कैलास अंबुडारे.यांची उपस्थिती होती