बडनेरा शहरासह विविध परीसरात नितीन कदम यांचेकडून ‘हक्काचे छत्र’ पदपथावरील लघुउद्योजकांनी घेतला योजनेचा लाभ

0
15
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

प्रतिनीधी/अमरावती

बडनेरा शहारातील सामाजिक सेवेसोबतच नागरीकांच्या विविध मूलभूत सुविधांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम नितीन कदम व त्यांची संकल्प शेतकरी संघटना नेहमीचं करीत असते.

नुकतेच बडनेरा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पाण्याचे विविध स्त्रोतांच्या प्रकल्पाची बातमी माध्यमात झळकत असताना त्यांनीं शहरी भागातील पदपथावरील लघुउद्योजकांसाठी ‘हक्काचे छत्र’ उपक्रमाअंतर्गत ३८ व्यावसायिक छत्र्यांचे वितरण केलें.
देशभरासह उष्णतेने विक्रम मोडीत काढत त्या उष्णतेचे चटके विदर्भातील अमरावती मध्ये सोसावे लागत आहेत. या जळजळीत उन्हाच्या चढत्या पाऱ्यामध्ये पदपथावरील छोटे व्यावसायिक आपल्या उदरनिर्वाहासाठी झीज करून उघड्यावर उन्हाचे चटके सहन करतात. याच त्यांच्या सोईस्कर व्यवसायाकरिता नितीन कदम यांनी बडनेरा शहरासह यशोदा नगर, दस्तुर नगर, कलोती नगर, नवाथे चौक, गोपाल नगर व ईतर परीसरात अत्याधुनिक प्रणालीचे छात्र्यांचे वितरण करण्यात आले. दरम्यान ३८ पदपथावरील लघुउद्योजकांनी सदर योजनेचा लाभ घेतला यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम सचिव, पर्वेश कदम,अक्षय धुळस,स्वप्निल मालधूरे,अभिषेक सवाई,अंकुश मोरे,आकाश पाटील व संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते

veer nayak

Google Ad