शहरात पाच रु व दहा रु स्टॅम्प तिकिटाचा तुटवडा. नागरिका ना आर्थिक फटका तीव्र संताप. दुय्यम निबंधक अधिकारी चे नागरिकांच्या गंभीर समस्या कडे दुर्लक्ष 

0
0

चांदुर रेल्वे / शासकीय कामकाजा सह कोर्टाच्या कामासाठी इतर दस्तऐवज दाखल करण्यासाठी अर्जाला दहा रु किंमती चे स्टॅम्प तिकीट लावणे शासनाने बंधनकारक केले आहे,परंतु शहरातील तिकीट विक्री धारकां कडे दहा रु किंमती चे तिकीट उपलब्ध नसल्याने शासकीय कामासाठी नागरिकांना वीस रुपये किमतीचे तिकिटे लावावे लागत आहे, यामुळे नागरिकांना आर्थिक भुदंड स्वीकारावे लागत आहे मात्र नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे स्थानिक दुय्यम निबंधक अधिकारी यांचे सर्रास दुर्लक्ष होत असून याबाबत विचारणा केली असता कोणत्याही लेखी स्वरूपाचे पाठपुरावा संबंधित अधिकाऱ्याने केली नसल्याचे दिसून आले, तर फक्त तोंडी पाठपुरावा केल्या बाबतचे स्थानिक दुय्यम निबंधक अधिकारी यांचे म्हणणे आहे ते सुद्धा स्थानिक स्टॅम्प विक्रेता यांना विचारूनच आपण पाठपुरावा केला का,?याबाबत संबंधित प्रशासन झोपेचे सोंग घेतलेले आहे याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांनी आतापर्यंत दखल घेतली नाही व त्याचा पाठपुरावा सुद्धा केला नाही असे नागरिकात चर्चा आहे,

नागरिकांना शासकीय कामकाजा विरोधात निवेदने धरणे उपोषण व त्यानंतर तीव्र आंदोलन इत्यादी मार्ग नागरिकांनी स्वीकारावे काय? असा प्रश्न नागरिकात पडलेला आहे,

नुकताच विविध परीक्षेचे निकाल शासनाकडून जाहीर होत असताना पुढील शैक्षणिक कामासाठी व विशेषतः दाखले, मिळविण्यासाठी,शासकीय कामकाजा करता नागरिकांना अर्ज दाखल करावे लागते अर्ज दाखल करीत असताना त्या अर्जावर दहा रुपयाचे तिकीट लावणे बंधनकारक आहे, मात्र दहा रुपयाचे तिकीट हल्ली उपलब्ध नसून त्या ठिकाणी वीस रुपयाचे तिकीट नागरिकांना लावावे लागत आहे, याबाबत संबंधित प्रशासनाने दहा रुपयाचे तिकीट लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे ही मागणी नागरिकात जोर धरत आहे,

आम्ही स्टॅम्प तिकीटा संदर्भात पाठपुरावा केलेला आहे, पुढे सुद्धा करणार आहे,

अभिजीत विधाते

दुय्यम निबंधक चांदुर रेल्वे

शहरातील थंडगार दुय्यम निबंधक कार्यालयात स्थानिक स्टॅम्प विक्रेता यांचा जमा वडा दिसून येते, तर शासनाला लाखो रुपयाची स्टॅम्प ड्युटी देणारे खरेदी विक्रेते यांना मात्र बाहेरच्या दालनात उभे राहण्याची वेळ येते

veer nayak

Google Ad