स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये गुणवंतांचा सत्कार

0
13
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे दि. १८ एप्रिल : स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या प्रचिती धर्माधिकारी होत्या, तर प्रमुख उपस्थितीत उपप्राचार्य तुषार रेवतकर, प्रशासकीय अधिकारी प्रितेश जनवाडे, श्रीकांत निस्ताने तसेच वर्गशिक्षिका स्नेहा कोम्बे आणि अर्चना नांदेकर यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या प्रसंगी पार्थ पनपालिया (९५.६%), नैतिक निस्ताने (९४.६%), चंचल मनकानी (९३.८%), तिलक पनपालिया (९३.२%), निकुंज मुंधडा (९२.८%), सारांश जाजू (९२.२%), आस्था इंगोले (९०.४%), अक्षरा दाते (९०%), अभंगा लंगरे (८९.८%), दिव्यांका मीठे (८९.४%), आराध्या डाफे (८९.४%), राघव जोशी (८९.२%), अनुष्का धोंडगे (८९%), श्रेया घारपळकर (८९%), केतकी वानखेडे (८८.८%), ईश्वरी सातरोटे (८८.४%), सर्वेश जाजू (८८.२%), आदित्य वावरे (८६.४%), जान्हवी लोढा (८६.४%), अन्वयी बिरे (८६%), रुद्र आडे (८५.६%), समृद्धी कोम्बे (८५.२%), दिपेन पनपालिया (८१.२%) आणि अनुरूप भैसे (८०.४%) या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट गुणवत्तेने शाळेचा लौकिक उंचावला.

या सन्मान सोहळ्यास विद्यार्थ्यांच्या पालकांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली होती. पालकांनी शाळेत उपस्थित राहून आपल्या पाल्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच काही पालकांनी आपल्या भावना व्यक्त करत शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीचे व शिक्षकांच्या समर्पित कार्याचे मनापासून कौतुक केले. त्यांच्या या उज्ज्वल यशामागे असलेली चिकाटी, परिश्रम आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा गौरव उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून केला. प्राचार्या प्रचिती धर्माधिकारी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी सातत्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित करत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना नांदेकर यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाचा समारोप आभारप्रदर्शनाने झाला. या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण झाली असून शाळेच्या यशस्वी परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

veer nayak

Google Ad