अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या क्षेत्रिय स्तरावरील समस्यांवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली व बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.मनोजभाऊ चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील जुन्या व नव्या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असल्याचे दिसून आले.
जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची कामातील दिरंगाई झालेल्या बैठकीतुन पहायला मिळाली. अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर जवळपास साडेतीन तास चर्चा करण्यात आली असु जिल्ह्यातील फक्त पंचवीस टक्केच प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना आपले प्रश्न मांडण्यासाठी संधी मिळाली.त्यामुळे पंच्याहत्तर टक्के प्रकल्पांवरील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर वेळे अभावी चर्चा होऊ शकली नाही.त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये तिव्र नाराजी दिसून आली.आपण आपल्या भविष्याचा कुठलाच विचार न करता आपल्या जमीनी घरे इत्यादीं सर्वस्वाचा त्याग करुन आयुष्यातील फार मोठी चुक केली असल्याचे प्रकल्पग्रस्तांच्या बोलण्यातुन दिसून आले.बेंबळा , अप्पर वर्धा,लोअर वर्धा सारख्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या गेल्या विस वर्षापेक्षा अधिक कालावधी पासुन सुटता सेटेना असी परिस्थिती असुन मग अधिकारी काय करतात हा प्रश्न झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी तथा बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पडला आहे.प्रकल्प पुर्ण करत असताना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते हे निश्चित झाले असुन. लोकप्रतिनिधींनी याकडे आपले कर्तव्यांची जाणिव ठेवून जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले.बैठकीतुन संघटनेचे अध्यक्ष मनोज भाऊ चव्हाण यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.यावेळी शेकडोंच्या संख्येने जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त महीला पुरुष व तरुण मंडळी उपस्थित होती.ज्या प्रकल्पांवरील समस्यांना चर्चेत सामील करुन घेता आले नाही अशा सर्व प्रकल्पाच्या बैठकी दर महिन्याला घेणार असल्याचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले. या बैठकीला संघटनेचे मनोज भाऊ चव्हाण, सचिव गौतम खंडारे, उपाध्यक्ष प्रा.निलेश ठाकरे,राजीव लोणकर,संजय गिद, मारोतराव भुजबळ, मंगेश इंगोले, श्रीकृष्ण बैलमारे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रध्दा उदावंत, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर,अरखराव,जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता राजभोज, कार्यकारी अभियंता गुरव, चौधरी, राऊत मॅडम, सर्व विभागांचे संबंधित अधिकारी व मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते












